[metaslider id=67]
प्रस्तवाना:

चंद्रपूर जिल्हायाचे विभाजन होऊन दिनांक २६.०८.१९८२ पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. याशिवाय परिषदेच्या अधिकार शेत्रातील एकूण १२(बारा) पंचायत समित्या आहेत. पंचायत समित्याचे नावे अनुक्रमे १) गडचिरोली २) आरमोरी ३) कुरखेडा ४) धानोरा ५) चामोर्शी ६) अहेरी ७) एटापल्ली ८) सिरोंचा ९)भामरागड १०) मुलचेरा ११) कोरची व १२) देसाईगंज.

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण ४६७ ग्रामपंचायत असून ९६ स्वतंत्र ग्रामपंचायत व ३७१ गट ग्रामपंचायत आहेत. जिल्हयातील एकूण खेडयाची संख्या १,६८० आहे. एकूण लोकसंख्या पैकी ३,७१,६९६ लोकसंख्या अनु जमातीची आहे तसेच अनुसूचीत जातीची लोकसंख्या १,०८,८२४ आहे. जिल्हायाचे उत्तरास भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव व बस्तर जिल्हा, दक्षिणेस आंध्रप्रदेशातील करीमनगर व आदिलाबाद जिल्हा व पशिचमेस चंद्रपूर जिल्हा आहे. वैनगंगा ही ह्या जिल्हयाची प्रमुख नदी असून ती जिल्हयाच्या पश्चिम दिशेकडून वाहते व तिची जिल्हयाची सीमारेषा आहे.

या जिल्हयाचा क्षेत्रफळ १५,४३३.३८ चैा.कि.मी.असून त्यापैकी १३,७०८ चैा.कि.मी वना खाली आहे . जिल्हयाच्या उत्तर-दक्षिण सीमेवर वैनगंगाखो-यात मोडतो. जिल्हयात १६१३ जिल्हा परिषदेची माजी मालगुजारी तलाव व १७ लघु पाटबंधारे तलाव एकूण १६३० तलाव व ७८८८ सिंचन विहिरी आहेत.सरासरी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मुख्यत्वे करून धानाचे पिक घेण्यात येते. लोकांचा मुख्य व्यावसाय शेती असून मच्छीमारी, तेंदूपाने, गोंद गोळा करणे इत्यादि जोडधंदे आहेत.

या जिल्हायात लोह, चुनखडी, अर्भ्रक याचे साठे विपूल प्रमाणात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने बारामाही रस्ते उपलब्ध नसल्यामुळे उद्योग धंद्याच्या बाबतीत जिल्हा मागासलेला आहे.

१) आरमोरी येथे कोसा उद्योग केंद्र आहे . वैरागड येथे ऎतिहासीक किल्ला. भांडारेश्वर व गोरजाईची हेमांडपंथी देवालय आहे.

२) जिल्हयातील देसाईगंज (वडसा) येथे एकमेव रेल्वेस्थानक असल्यामुळे ते व्यापाराचे केंद्र बनले आहे. तसेच येथे वळू माता संगोपन केंद्र आहे. येथे कागद कारखाना देखील आहे.

३) कुरखेडा येथे गुरांची मोठी बाजारपेठ आहे.या तालुक्यातील खोब्रामेंढा रमनीय क्षेत्र असून येथे हनुमानाची भव्य मूर्ती आहे

४) चामोर्शी तलुक्यातील मार्कंडादेव येथे अतीप्राचीन मार्कंडेश्वर देवालय आहे. या ठिकाणावर वैनगंगा नदी उत्तरवाहीणी असून येथे मोठी यात्रा भरते. याच तालुक्यात चपराळा हे ठिकाण प्राणहिता नादीच्या काठावर असून याला प्रशांतधाम असेही म्हणतात. येथे मोठी यात्रा भरते. येथील अभयारण्य प्रसिध्य आहे. आष्टी येथे कागद कारखाना आहे.

५) अहेरी तालुक्यातील आलापल्ली परिसरातील वनश्री पाहण्यासारखी आहे. येथील सागाचे लाकूड उत्तम प्रतीचे आहे. वनखात्याचा लाकुडकटाई कारखाना येथे आहे.

६) एटापल्ली भागात सैर उर्जेवरील दिव्यांचा वापर केला जातो. येथे सैर उर्जासाठी स्तंभ उभारण्यात आलेला आहे.

७) भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे आदिवासीसाठी लोकबिरादरी केंद्र व आश्रम आहे. आश्रमातील प्राणी संग्रहरलय पाहण्यासारखा आहे. तसेच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्यांचा त्रीवेणी संगम आहे.

error: Content is protected !!